Faijpur

कुस्तीमल्ल विद्या महासंघ जि. जळगाव जाहीर सत्कार कार्यक्रम सऺपन्न.

फैजपुर,कुस्तीमल्ल विद्या महासंघ जि. जळगाव जाहीर सत्कार कार्यक्रम सऺपन्न.

सलीम पिंजारी

फैजपूर ता यावल शहरात स्पार्टनं जिम या व्यायाम शाळेत कुस्तीमल्ल विद्या महासंघ (महाराष्ट्र) जि जळगाव यावल तालुका , भुसावळ तालुका , जामनेर तालुका अध्यक्ष , उपाध्यक्ष व कार्यकारणी नियुक्त झालेल्या पदाधिकारी अश्यांचे यावल तालुका सामाजिक कार्यकर्ते मा.नगर सेवक कलीमखा शेख माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक न.पा. फैजपूर , तसेच मा.श्री कुर्बान शेख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक न.पा. फैजपूर यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या वरील कुस्तीमल्ल विद्या महासंघ जि जळगाव अश्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमात फैजपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू सलीम पीजारी हजर होते सदर कार्यक्रमात कुस्तीमल्ल विद्या महासंघ जि जळगाव यावल तालुका , जामनेर तालुका, भुसावळ तालुका येथील प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे नाव व पद घेऊन जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री कलीम मेंबर हे होते सदर कार्यक्रमात कुस्तीमल्ल विद्या महासंघ महाराष्ट्राचे संस्थापक मा. पै गणेश मानगुळे साहेब , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री युवराज वाघ साहेब , उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस श्री धर्मराज जी पाटील साहेब(मेजर) , जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री अण्णा कोळी साहेब यांनी कठोर परिश्रम घेऊन ही संघटना तयार केली त्या संदर्भात सदर कार्यक्रमात कुस्तीचे महत्त्व , लाल मातिचे महत्त्व होणारे फायदे इ. वर यावल तालुका अध्यक्ष श्री शकील पहेलवान , सल्लागार श्री ऍड नितीन भावसार, संजय जैन पहेलवान , जमील पहेलवान (खलिफा) अश्यांनी आप आपल्या उत्कृष्ट भाषणात मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली सदरचा कार्यक्रमात रावल तालुका अध्यक्ष शकिल पहेलवान व फैजपुर शहर अध्यक्ष नाशीर शेख यान्नी मागॆदशॆन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button