फैजपूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पोलिसांतर्फे कडक लॉक डाऊन ची अंमलबजावणी व्हावी म्हणून डीवायएसपी सह पाेलिस नगरपरिषद रस्त्यावर
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना च्या भयंकर आजाराने अनेक नागरिकांचे बळी गेले या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून अनेकवेळा लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाली परंतु कोणताही परिणाम दिसून येत नसल्यामुळे शासनाला पुन्हा गंभीर स्वरुपाचा निर्णय घ्यावा लागला म्हणून पुन्हा राज्यासह जळगाव जिल्ह्यात पुन्हा कडक लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाली या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून आज फैजपूर शहरात अकरा वाजेनंतर केवळ अत्यावश्यक सेवा यांनाच परवानगी दिली आहे आणि विनाकारण दुकान उघडून किंवा बाजारात गर्दी करू नये म्हणून तसेच गावोगावी विनाकारण जाणे येणे याला प्रतिबंध बसावा म्हणून फैजपुरात सुद्धा याची काटेकोरपणे पोलिस व नगरपरिषद गंभीर पणे दखल घेऊन कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे कोणत्याही रिकाम्या येणार्या जाणार्या वाहनासह नागरिकांवर पोलिस नजर ठेवत असून कोरोना ला लॉक डाऊन हाच एक पर्याय उरलेला असल्याचे शासनाकडून सुद्धा वेळोवेळी सांगण्यात येत आहे नागरिकांनी याचे पालन करावे हाच एक महत्त्वाचा मार्ग असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे यापाठोपाठ फैजपूर शहरात याची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून येथील फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे हे स्वतः गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहे त्यांच्यापाठोपाठ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण हेसुद्धा गेल्या वर्षभरापासून अतोनात मेहनत घेत आहे तसेच फैजपूर चे एपीआय प्रकाश वानखडे व पीएसआय रोहिदास ठोंबरे हेसुद्धा गेल्या वर्षभरापासून कधीही न थांबता
फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात बंदोबस्त ठेवून जबाबदारी पार पाडत आहे म्हणून डीवायएसपी नरेंद्र पिंगळे एपीआय प्रकाश वानखडे पीएसआय रोहिदास ठोंबरे हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांची ओळख झाली आहे त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारीअनिल महाजन राजेश बऱ्हाटे विलास झांबरे वाहतूक पोलिस बाळू भोई दिनेश भोई दिलीप तायडे वय झालं नाही आधी पोलिस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवला आहे आहे






