Faijpur

फैजपूर शहरातील हायमास्ट लाईट ठरले ‘शो पीस ‘

फैजपूर शहरातील हायमास्ट लाईट ठरले ‘शो पीस ‘

फैजपूर सलीम पिंजारी प्रतिनिधी तालुका यावल

शहरातील प्रमुख रस्ते व कॉलन्या, नगर या भागातील हायमास्ट लाईट गेल्या ६-७ महिन्यापासून बंद अवस्थेत आहे . यावल रोड, मुख्य बाजारपेठ ,विद्यानगर या भागात हायामास्ट दिवे लावण्यात आले या भागातील दिवे त्वरीत सुरु करावे अशी नागरीकांची मागणी आहे . . शहरातील विविध भागात या हायमास्ट लाईट बसविण्यात आले . मात्र हे लाईट बंद आहेत वारंवार ठेकेदाराला सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते .ठेकेदाराकडून उडवा उडवाची उत्तरे देण्यात येतात . या तक्रारीची दखल कोणी घेत नसेल तर हे पोल ( हायमास्ट ) लाईट येथून हलवून टाकावेत अशी विद्यानगर भागातील रहिवांशाची तक्रार आहे . गणेश उत्सवात व दुर्गोत्सव उत्सवात पासून हे हायमास्ट लाईट बंद अवस्थेत आहेत या बाबत तक्रार करून ही कोणी याची दखल घेत नाही . नगरपालिका म्हणते याची जबाबदारी आमची नाही . विज वितरण कंपनी म्हणते ते आमचे काम नाही तर मग ठेकेदार यांना सांगून ही आज करतो , उद्या करतो असे उत्तरे मिळत आहे .वारंवार सांगून देखील याबाबत दुर्लक्ष करण्यात येते .तक्रार करूनही रहिवांशी अक्षरशा कंटाळले .आहेत . या परिसरातील हायमास्ट फक्त देखावा आहे . जर का ठेकेदार हे काम पूर्ण करू शकत नसेल तर सार्वजनिक ठिकाणाहून ते दुसरीकडे हलविण्यात यावे अशी रहिवांशाची मागणी आहे . हायमास्ट लाईट बंदच असतील तर त्याचा काय उपयोग ते फक्त ‘शो पीस ‘ ठरले आहे . नगरपालिकेने बसविलेले लाईट सुद्धा बंद अवस्थेत आहेत .हे त्यापेक्षा जास्त अधिक महत्वाचे आहेत वर्षानुवर्ष बसविलेले हे लाईट उत्तम आणि चांगली सुविधा देतात असे नागरिकांचे म्हणणे . शहरातील यावल – रावेर या मुख्य रस्त्यावर मार्गावर वाहतुकीची मोठी रहदारी असते .सुभाष चौकात नेहमी गजबजलेला असतो मात्र येथील हायमास्ट लाईट सुरू होते त्यामुळे सुभाष चौक चे वैभव या लाईटच्या प्रकाशामुळे सुंदर दिसत होते . प्रसंगी रात्रीच्या वेळेस ये -जा करणाऱ्या वाहनास वाहतूक सुरळीत होत असे . मात्र येथील हायमास्ट लाईट बंद असल्याने असल्याने सुभाष चौकातील रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची दाट शक्यता आहे .या प्रकाराबाबत हायमास्ट लाईट बंद असल्याने याबाबत वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते याचे नवल फैजपूरवाशीयांना वाटते .शहरातील मुख्य चौक व छोटे-मोठे राजकीय पदाधिकारी नेते ,उपनेते, शहर प्रमुख यांच्या घराजवळच हायमास्ट लाईट मात्र सुरू असतात इतर ठिकाणी ते तर बंद आहेत . ठेकेदाराकडून या प्रकाराकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करण्यात येत असल्याची ओरड येथील रहिवाशांची आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button