Chandwad

चांदवडचे प्रथम व माजी नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांची पदावर नसतानाही विकास कामात नव्याने भर

चांदवडचे प्रथम व माजी नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांची पदावर नसतानाही विकास कामात नव्याने भर उदय वायकोळे चांदवड चांदवड : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यामार्फत होणाऱ्या नाशिक ते धुळे नॅचरल गॅसची पाईपलाईन अंतर्गत चांदवड शहराचा समावेश करणेबाबत चांदवड येथे आलेले राजेशजी पांडे, महाराष्ट्र नॅच्युरल गॅसचे डायरेक्टर हे उपस्थित असताना याना चांदवड शहरांतर्गत गॅस पाइपलाईन टाकण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्र देण्यात आले होते. सद्या चालू असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाईनच्या कामांमध्ये व इतर काही विकास कामे चालू असताना गॅसची पाइपलाईन करणे अत्यावश्यक असल्याने गरजेचे आहे त्यास अनुसरून आज बैठक आयोजित करण्यात आली होती .
या शहरांची २०११ च्या जनगणनेनुसार २५,३४१ इतकी लोकसंख्या असून सध्याची व तरंगती लोकसंख्या अंदाजे ३५००० ते ४०००० इतकी आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता शहरांमध्ये नेमिनाथ जैन संस्था व सर्व मुख्य प्रशासकीय कार्यालये असून हे एक तालुक्याचे मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. नवीन रस्त्यांची कामे, भूमिग योजनांच गॅस डिस्ट्रीब्यूशन प्रोज. चांदवड नगरपरिषदेमार्फत विविध विकास कामे सुरु असून सदर योजना चांदवड नगरपरिषदेत राबविल्यास चांदवड नगरपरिषदेकरिता हि नाविन्यपूर्ण संकल्पना असेल. यासाठी आपण आपल्या स्तरावर या चांदवड शहरासाठी नॅचरल गॅसची पाईपलाईन उपलब्ध करून द्यावी असे यापूर्वी झालेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले होते.
या सर्व विषयास अनुसरून आज दि.10/01/2021 वार रविवार रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता नॅचरल गॅस योजनेचे प्रमुख श्री. राजेशजी पांडे डायरेक्टर, सुप्रियो हलदार मॅनेजिंग डायरेक्टर, माणिक कदम जनरल मॅनेजर, अमोल हट्टी बि. डी.इन्चार्ज, संदीप श्रीवास्तव जी.ए. हेड नाशिक-धुळे, राजेश आढाव जनसंपर्क अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत रेस्ट हाऊस येथे सदर योजना कार्यान्वीत करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी राजेशजी पांडे साहेब यांनी असे सांगितले की आम्ही लवकरच चांदवड शहराला नॅचरल गॅस पुरवठा करण्यासाठी भूषण कासलीवाल यांच्या पत्राच्या मागणीवरून प्रयन्तशील आहोत. यासाठी काही दिवसातच आपल्याकडे टेक्निकल टीम अंतर्गत सर्वे करून सदर विषय तात्काळ मार्गी लावण्यात येईल. यामुळे इंधन वापरात स्थानिक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले यामुळे 60% इंधनाची किंवा आर्थिक बचत होऊन याचा लाभ प्रत्येक्षात नागरिकांना होईल असे सांगितले.यामध्ये घरगुती वापर,हॉटेल व्यवसाय,हॉस्टेल,लहान मोठे लघु उदयोग,यासाठी याचा फायदा होईल. यावेळी चांदवड शहरातील श्री अशोक काका व्यवहारे,सुनील डुंगरवाल,प्रशांत ठाकरे,मुख्याधिकारी अभिजित कदम,मनोज बांगरे,गणेश पारवे,अंकुर कासलीवाल ,नितीन फंगाळ आदि उपस्थित होते.
या साठी मा.श्री. भूषण कासलीवाल यांनी ०३/०२/२०१९ रोजी मा.पेट्रिलियम तथा नैसर्गिक वायू मंत्री मा. धर्मेंद्रजी प्रधान ,एम.एन.जी.एल. डायरेक्टर राजेशजी पांडे ,मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडे पाठपुरावा करून सदर योजना मंजूर करणे साठी पत्रव्यवहार केला होता.यानंतर सन्माननीय पांडे साहेब यांनी या प्रकल्पास सकारात्मक होकार दर्शवलाव त्या बाबत आज स्पष्ट खुलासा करण्यात आला.
.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button