समसापूर येथे अँटी कोरोना फोर्सची स्थापना
प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
देशात कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून जनतेचे जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झालेले आहे या पासून बचाव व्हावा म्हणून शासनाकडून अतोनात प्रयत्न सुरू आहे या रोगाचा फैलाव होऊनये म्हणूनच २१दिवाचे लॉक डाऊन केल्यानंतर ही कोरोना आटोक्यात येतं नाही म्हणून
रेणापूर तालुक्यातील समसापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या आदेशानुसार सरपंच व ग्रामसेवक यांनी अँटी कोरीना फोर्सची केली स्थापना
दिनांक १७ एप्रिल 2020 वार शुक्रवार अँटी कोरोना फोर्सची स्थापना करून शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करण्यासाठी गावात जनजागृती करून पूर्व सूचना देण्यात आली विनाकारण बाहेर फिरणे सार्वजनीक ठिकाणी थुंकणे तोंडाला मास्क न लावणे उगाच गर्दी करणे आदी नियमाचे पालन नाही केल्यास ग्रामपंचायत कडून दंड वसूल करण्यात येईल असेही यावेळी समसापूर येथील जनतेला सूचना देऊन गावातील मुख्य रस्त्यावर चेक पोस्ट तयार करण्यात आले बाहेर गावावरून येणारी प्रत्येक व्यक्तचे चौकशी करून त्यांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात येईल असे सांगितले
सरपंच व ग्रामसेवकांनी अँटी कोरोना फोर्सची स्थापन केले यावेळी सरपंच अजित गायकवाड तसेच ग्रामसेवक बी वी गायकवाड तसेच भिम आर्मी चे जिल्हा प्रमुख विलास चक्रे सह भिम आर्मी टीम व अँटी कोरोना फोर्स चे सर्व पदाधिकारी हजर होते






