World

Elon Musk on EVM: EVM बद्दल एलन मस्कचे मोठं विधान… हॅकिंग बद्दल केला सर्वात मोठा गौप्य स्फोट…

Elon Musk: EVM बद्दल एलन मस्कचे मोठं विधान… हॅकिंग बद्दल केला सर्वात मोठा गौप्य स्फोट…

भारतात ईव्हीएमवरुन गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पक्षांनी नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी सातत्याने EVM ला विरोध करून बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याचे आवाहन अनेक वेळा केले आहे.आणि EVM बंद करण्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याविषयीची सर्वोच्च फैसला सुनावला आहे. पण अजूनही विरोधकांचं समाधान झालेले नाही. जनतेतही याबद्दल संभ्रम आहे. आता एलॉन मस्क याने या विषयावर बॉम्ब टाकला आहे.
ईव्हीएम मशीन बद्दल मोठा दावा करत हे मशीन बंद करायला हवे कारण ते हॅक होऊ शकते असे एलन मस्क चे म्हणणे आहे.
भारतात EVM मशीनवरुन आधीच खूप मोठा गदारोळ आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाला सुद्धा अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना या मुद्यावरुन टोमणा मारला होता. लोकसभा निवडणूक 2024 पूर्वीपासूनच ईव्हीएमविरोधात विरोधकांनी रान उठवले होते. सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम निकाल दिल्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. त्यातच आता Tesla, SpaceX चे सीईओ आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कने पण यावर प्रतिक्रिया दिली आहे.एलन ने सोशल मीडियाच्या माध्यमातून ईव्हीएमप्रकरणात मोठा बॉम्ब टाकला आहे
एलॉन मस्क याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांच्या युनियर ही पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याने ईव्हीएम विषयी भावना व्यक्त केल्या आहेत. “इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नष्ट करायला हव्यात. या मशीन मानव आणि AI च्या मदतीने हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते.”, असे मत त्याने पोस्टमध्ये व्यक्त केले.

EVM हॅकिंगची भीती व्यक्त करत पेपर ट्रेल बद्दल मतदारांना माहीतच होणार नाही. तसेच पेपर ट्रेल म्हणजे बॅलेट पेपर, कोणाला मतदान केले याची माहिती देणारा कागद, जो मतदारांच्या हाती असतो. पण ज्या भागात असा पेपर ट्रेल नाही, तिथे अमेरिकन नागरिकांना माहिती पण होणार नाही की त्यांचे मतदान मोजण्यात आले की नाही आणि त्यांनी ज्या उमेदवाराला ते दिले, ते त्यालाच मिळाले? अशी शंका केनडी यांनी व्यक्त केली. त्याला एलॉन मस्क याने उत्तर दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button