डोमा स्वस्त धान्य दुकानदाराची
मनमानी
स्वस्त धान्य दुकानदार वर कार्यवाही करण्याची मागणी चिमूर/प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर तालुक्यातील डोमा येथील स्वस्त धान्य दुकानदार यांचा मनमानी कारभारा मुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून ते काही स्वस्त धान्य कार्ड धारकांना नाहक त्रास देत असून समाधानकारक उत्तर न देता उद्धटपणे बोलत असून ते नियमानुसार धान्य देत नसल्याने याबाबत तहसील कार्यालय चिमूर यांना तक्रारकर्त्यांनी तक्रार करून थातूर मातूर चौकशी करण्यात आली असल्याने पुन्हा चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायत व दक्षता समितीने केली आहे डोमा येथील स्वस्त धान्य दुकान अंतर्गत नियमित व कोरोना असल्याने मोफत धान्य वाटपात घोळ झाला असताना तहसील कार्यालय चिमूर यांना तक्रार केली असता उपरे नावाचे महसूल अधिकारी आले असता पंधरा कार्डधारकात घोळ निर्माण झाल्याचे आढळले
स्वस्त धान्य दुकानदार हे कार्डधारकांना शिवीगाळ करीत असल्याचे सुद्धा सांगण्यात आले असून मनमानी कारभार करीत आहे वारंवार तक्रारी करून ही महसूल प्रशासन पाठीशी घालत असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आले
डोमा येथील स्वस्त धान्य दुकानदार यांचे वर तात्काळ कारवाई करण्याची मागणी तक्रार कर्ते घनश्याम मुन यांनी केली असून याकडे सुद्धा लोकप्रतिनिधी नी दखल घेण्याची मागणी केली असून तसेच ग्राम पंचायत डोमा यांनी पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार आमदार बंटीभाऊ भांगडीया व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तक्रारी दिल्या आहेत तेव्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदार यांचेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सरपंच कमल सेलोरे उपसरपंच देवानंद मालके ग्राम पंचायत सदस्य कल्पना डांगे व तक्रारकर्ते घनश्याम मुन यांनी केली आहे .






