Nashik

पिंपळगाव लेप येथील जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांना दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने एक वही एक पेन वाटप,

पिंपळगाव लेप येथील जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांना दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने एक वही एक पेन वाटप

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक= डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी धर्मांतरची गगनभेदी गर्जना केली आज त्याच येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप ह्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना एक वही एक पेन दान पारमिता फाउंडेशन तर्फे वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले,
दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात गरजू विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते.
पिंपळगाव लेप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना दान पारमिता फांऊडेशन चे संस्थेचे पदाधिकारी व भिमतेज मिञ मंडळ प्रणित आंबेडकर जंयती सचिव नितीन दूनबळे यांच्या दानातून शालेय साहित्य देण्यात आले ,
शाळेतील मुलांनी उत्कृष्ट असे भाषणे केली शिक्षक संतोष गायकवाड व संतोष आंभोरे, सुनील खरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दान पारमिता फाउंडेशनचे संचालक सुनील खरे , संतोष आंभोरे, नितीन दुनबळे व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.उज्वला मेतकर , किरण कापसे , संतोष गायकवाड ,श्रीम.कल्पना बोचरे , दगू सोनवणे, योगेश देशमुख, पायल दुनबळे , सह आंबेडकर जंयती ऊत्सव समिती चे सुनिल दुनबळे सिध्देश दुनबळे प्रसाद दुनबळे सह पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी गौरव रसाळ व संकेत दौंडे यांनी अतिशय सुंदर सुत्रसंचलन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button