चिमुर प्रतिनिधी
देशात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातला असून संपूर्ण देशात संचार बंदी असताना चिमुर येथील पोलीस विभाग,उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी व जनतेची सुरक्षा लक्षात घेता चिमुर टायगर रिसोर्ट च्या वतीने मास्क वाटप करण्यात आले तसेच चिमुर तालुक्यातील विविध गावात दहा हजार मास्क वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चिमुर टायगर रिसोर्ट चे मालक हेमंत गाणार यांनी सांगितले आज चिमुर येथे तहसील कार्यालया,पोलीस विभागाचे कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले याप्रसंगी चिमुर टायगर रिसोर्ट चे मॅनेजिंग डायरेक्टर सौरभ सिह,तलाठी बेंबाळकर, अंगणवाडी कर्मचारी सभेचे जिल्हा अध्यक्ष इम्रान कुरेशी,अनिकेत गाणार उपस्थित होते सुरक्षित अंतर ठेवून मास्क वाटप करण्यात आले






