पंढरपुरातील सर्व संस्थात्मक विलगिकरण कक्ष तसेच कोविड केअर सेंटर MIT वाखरी पंढरपूर येथे होमोईओपॅथिक गोळ्यांचे वाटप — डॉ पल्लवी पाटील
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर – ‘केंद्रीय आयुष मंत्रालय,भारत सरकार प्रमाणित आर्सेनिकम अल्बम 30 या रोगप्रतिकारक तसेच कोविड-19 प्रतिबंधक औषध हे मे महिन्यापासून पंढरपूर मधील सर्व संस्थात्मक विलगिकरण कक्षामध्ये असणाऱ्या नागरिकांना
नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ बजरंग धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली
देण्यात येत आहे’ अशी माहिती डॉ पल्लवी पाटील यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे ‘आर्सेनिकम अल्बम 30’ हे औषध कोविड केअर सेंटर MIT वाखरी, पंढरपूर येथील पॉझिटिव्ह आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट रुग्णांना देखील देण्यात आली आहेत. आतापर्यंत आर्सेनिक अल्बम 30 हे औषध न्यू सातारा संकुल, पै दिगंबर महाराज मठ, श्री विठ्ठल ग्यानबा तुकाराम महाराज मठ, श्री संत तनपुरे महाराज मठ, केंद्रे महाराज मठ, के. बी. पी. कॉलेज पंढरपूर येथे संस्थात्मक विलगिकरण कक्षात असणाऱ्या लोकांना देण्यात आली आहे.
त्याचबरोबर विलागीकरण कक्षात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी यांना देखील आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या देण्यात आल्या आहेत. ब्रह्मपुरी (ता.मंगळवेढा ) येथे विवेकानंद शिवाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या प्रत्येकी 5 आणि लहान मुलांना प्रत्येकी 2 या प्रमाणात 3 दिवस देणे, गोळ्या घेतल्यानंतर 1 तास अन्न पाणी न घेणे आणि या 3 दिवसांमध्ये कच्चा कांदा, कच्चा लसूण, कॉफी यांचे सेवन करू नये आदी सूचना देखील करण्यात येत आहेत. या गोळ्यांबरोबरच मानसिक आरोग्य सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी योगा, व्यायाम, प्राणायाम करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
विलगीकरण कक्षात असणाऱ्या लोकांची दैनंदिन आरोग्य तपासणी होत आहे. अशा प्रकारे संस्थात्मक विलगिकरण कक्षात असणाऱ्या लोकांची पंढरपूर नगरपालिकेकडून काळजी घेतली जात आहे. यासाठी विलगिकरण कक्षात असणाऱ्या लोकांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, डॉ बजरंग धोत्रे, डॉ. राजश्री सालविठ्ठल, डॉ. वृषाली पाटील, डॉ. पल्लवी पाटील आणि पंढरपूर नगरपालिका कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.






