विधवा महिला,घरकाम करणाऱ्या महिला आणि रिक्षा चालक यांना भारतीय हितरक्षक सभा, ,मेत्ता संघ आणि युवा किसान यांच्या तर्फे किराणा सामानाचे वाटप.
प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक -देशात आणि राज्यात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाउन’ करण्यात आले आहे.
या लाॅकडाऊनच्या काळात कामगार कष्टकरी वर्गाला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे.हातावरील लोक जीवन जगण्यासाठी धडपड करीत असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
सिडको,नाशिक या भागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो .लॉकडाउनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
त्यामुळे भारतीय हितरक्षक सभा, भारत चे सभानायक मा. किरण मोहिते सर , सभानायक कृष्णा शिंदे , मेत्ता संघाचे मा.सुदर्शन साळवे सर आणि नाशिक युवा किसानचे मा. तुषार दोंदे सर, ABCPR चे रवींद्र सावंत सर,मुकेश जाधव सर,अनिल जाधव सर यांच्या माध्यमातून कलम १४४ चा भंग न करता प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक अंतर ठेवून कुठलीही गर्दी न करता सिडको, नाशिक भागातील ४० विधवा महिला ,६० घरकाम करणाऱ्या महिला आणि ३५ रिक्षा चालक यांना साधारण ०१महिना पुरेल इतका किराणा साहित्य या किटमध्ये देण्यात आले आहे.तसेच १५० कुटुंबातील ६३० लोकांना मोफत रेशनिंग मिळवून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून त्यांनाही मोफत धान्य मिळवून दिले आहे.






