कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षकांच्या समस्या बाबत चर्चा
सलीम पिंजारी
फैजपूर = प्रतिनिधी = कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षकांच्या पाच समस्या बाबत गुरुवार रोजी दि.१९रोजी वेतन पथक अधिक्षक जळगाव बारोट साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हाध्यक्ष शैलेश राणे चर्चा केली.
यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून लवकरात लवकर व्हावेत. भ.नि.नि.,डिसीपीएस खात्यांसंदर्भात पुढील तालुक्याचे रजिस्टर अद्याप ही अपूर्णच आहेत त्यामुळे त्यांना मासिक कपातीचा हिशेब मिळण्यास विलंब होत आहे. जामनेर, भुसावळ, ४०गाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा बोदवड,अमळनेर या तालुक्यातील शिक्षकांनी त्वरित आपापल्या तालुका माध्य. मुख्याध्यापक संघ अध्यक्षांना भेटून आपले रजिस्टर अद्ययावत करून घेणे. २२०८ डिसीपीएस धारक शिक्षकांपैकी फक्त १७५शिक्षकांच्या मासिक कपातीच्या पावत्या तयार आहेत. एस.बी.आय.मध्ये सॅलरी खाते सुरू करणे अनिवार्य.लवकरात लवकर सदर खाते काढावेत.. शालार्थ आयडी मिळालेल्या मात्र वेतन सुरू आहे अशा शिक्षकांचे थकीत वेतन व ७व्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम तसेचइतर डिसीपीएस धारकांना मिळाव्याची रोख रक्कम अनुदान उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ जमा करण्यात येईल.
याप्रसंगी आदरणीय जेष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड, प्रा.श्री.शैलेश राणे(जिल्हाध्यक्ष), प्रा.नंदन वळींकार (सचिव), प्रा.सुनील सोनार (कार्याध्यक्ष), प्रा.अतुल इंगळे (उपाध्यक्ष) मिलिंद पाटील उपस्थित होते.






