मा.संचालक फलोत्पादन श्री. डॉ. कैलाशजी मोते साहेब यांची दिंडोरी तालुक्यास भेट.
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कृषी विभागाच्या फलोत्पादन विषयक सर्व योजनांचा आढावा घेण्यासाठी मा.संचालक फलोत्पादन डॉ. कैलाशजी मोते साहेब यांनी दिंडोरी तालुक्यात भेट दिली, सदर वेळी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील लाभार्थी श्री.संदीप सोमवंशी तसेच श्रीमती सुशीला वडजे, मडकिजांब यांचे पेरू बागेस भेट दिली, तसेच अलकाबाई बोराडे यांचे पॉलिहाऊस व नर्सरी ला भेट दिली. मडकिजांब येथील शेतकर्यांशी शेडनेट व पॉलिहाऊस बांधणी विषयी चर्चा केली, मॉडेल मध्ये करावयाचे सुधारणा बाबत
erector बरोबर देखील चर्चा करण्यात आली, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी मोहाडी येथे भेट दिली.दौऱ्यावेळी श्री. शिरसाठ,उपसंचालक कृषी, श्री. खैरनार , उपविभागीय कृषि अधिकारी,श्री अभिजीत जमधडे,श्री. पवार, मंडळ कृषी अधिकारी, श्री ठोके, कृषि पर्यवेक्षक, विमा प्रतिनिधी अमोल जाधव, कृषी सहायक श्रीमती गावित इत्यादी उपस्थित होते.






