Nashik

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये पर्यावरण पूरक रक्षाबंधन संपन्न

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये पर्यावरण पूरक रक्षाबंधन संपन्न

दिंडोरी- सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
राष्ट्रीय हरितसेना अंतर्गत इको क्लब चे वतीने जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे, पर्यवेक्षक डॉ जी व्ही आंभोरे, आर व्ही मोकळ, श्रीम एन पी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य रमेश वडजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पर्यावरण रक्षण करून वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे असून यामुळे मानवाला व प्राण्यांना ऑक्सिजन मिळत असतो.म्हणून आपण भाऊ बहिणीप्रमाणे नाते हे झाडांशीही जोडले पाहिजे.आणि म्हणूनच आपण वृक्षांनाही राखी बांधून पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरा करत आहोत.
याप्रसंगी इको क्लब सदस्यांनी व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इको फ्रेंडली राख्या यांचे प्रदर्शन भरविण्यात आले व सर्व राख्या या वृक्षांना बांधण्यात आल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण विज्ञान निष्ठा वैज्ञानिक दृष्टिकोन हे व इतर मूल्य रुजण्यास मदत झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय हरित सेना प्रमुख पी बी जाधव यांनी केले.
सकाळ सत्रात कलाशिक्षिका श्रीम डी के चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून राख्या तयार केल्या.
उपक्रम यशस्वीतेसाठी इको क्लबचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button