“धुळगाव जिल्हा परिषद शाळेत कोरोना पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान,
शांताराम दूनबळे
नाशिक -:येवला तालुक्यातील धुळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नवीन शैक्षणिक सत्र 2020 /21 जून 2020 पासून शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
जिल्ह्यात लाकडाऊन स्थिती असल्याने शासकीय यंत्रणा कोरोनाला आळा घालण्यासाठी व प्रतीबंध करण्यासाठी युध्दपातळीवर कामे करत आहे या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कामात शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा सहभाग असून १५ जुन २०२०पासून चालू शैक्षणिक वर्षांची सुट्टी संपत आहे परंतु सदय स्थितीत कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे म्हणुन शासनस्तरावरून १जुन ते ५जुन २०२० या कालावधीत ग्रामपंचायती. अंगणवाडी,तसेच जि .प.शाला या ठिकाणी असलेली जलकुभ,पिण्याचे पाण्याची टाक्या तसेच हातपंप यांची स्वच्छता व शुदधीकरण अभियान राबविण्या साठी जि .प.नाशिक यांच्या सुचनेनुसार धुलगाव ता येवला जिल्हा परिषद शाळेत परिसर,किचन शेड,पाण्याची टाकी यांची स्वच्छता करण्यात आली यावेळी
मुख्याध्यापक सय्यद सर,शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रम गायकवाड,उपसरपंच शशिकांत जगताप,दीपक गायकवाड स्वयंपाकी मदतनीस गायकवाड मावशी उपस्थित होते






