धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा भरत पाटील बिनविरोध
प्रतिनिधी नूरखान
शनिवारी धुळे शहरातील देवपूर भागात वाडीभोकर स्थित सुंदराई प्लाझामध्ये कार्यालय असलेल्या धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी कुसूंबा येथील एम के शिंदे महाविद्यालयातील प्रा भरत वसंतराव पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी झालेल्या बैठकीत प्राध्यापक पाटील यांची ही निवड एकमताने झाली. यावेळी नूतन अध्यक्ष प्रा भरत पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल
त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा. टी पी शिंदे, साधना शिंदे, व्हाईस चेअरमन डी टी पाटील , वसंतराव सूर्यवंशी, मधुकर सूर्यवंशी, तज्ञ संचालक प्रशांत साळुंखे विलास पाटील, बापू पाटील, मनोहर पाटील, प्रभाकर पाटील, आर टी पाटील, अमोल सोनवणे, अमृत पाटील, ज्योती पवार, दिनेश पाटील, यांच्यासह शालीक बोरसे, प्रा रवींद्र पाटील, पत्रकार चंद्रकांत पाटील, शांतीलाल पाटील आदींनी केले आहे






