Nandurbar

धनंजय निकम यांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे निरोप

धनंजय निकम यांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे निरोप

नंदुरबार फहिम शेख

उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांची मालेगाव येथे अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला.

यावेळी अपर‍ जिल्हाधिकारी बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, कैलास कडलग, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा ‍नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.भारुड म्हणाले, सातबारा संगणकीकरणात श्री.निकम यांनी चांगली कामगिरी केली. ते आपल्या कामगिरीने वरिष्ठाच्या मनात विश्वास निर्माण करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या बदलीमुळे प्रशासकीय कामकाजात निश्चितपणे पोकळी जाणवेल. मालेगाव येथे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते पदभार स्विकारणार आहेत. आपल्या कार्यकुशलतेमुळे ते या संकटातून शहराला बाहेर काढण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री.निकम म्हणाले, नंदुरबार येथील अनुभव लक्षात राहण्यासारखा आहे. येथे आणखी काही काळ कामकाज करण्याची इच्छा होती. प्रशासकीय कामकाज करताना नियम आणि संवेदनशिलता या दोन्हींचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी नेहमी उपलब्ध असेन, असे त्यांनी सांगितले. नंदुरबारकरांच्या शुभेच्छांच्या बळावर मालेगावलाही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री.बोरूडे, श्री.गोगटे, श्री.कडलग, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, राहुल वाघ, ओम कुलकर्णी, संजय मुळे आदींनी श्री.निकम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button