निराश्रित,भिक्षेकरी, परप्रांतीय गरजू लोकांना भोजनदान
चिमूर कुणबी समाज संघटनाची सामाजीक बांधीलकी
प्रतिनिधी चिमूर
कोवीड १९ मुळे देशात लाकडाऊन व संचारबंदी करन्यात आली त्यामुळे अनेक नागरीक जिथले तिथेच अडकले कोरोणाचा संसर्ग प्रादुर्भाव टाळन्यासाठी नागरीकांना घराबाहेर पडने शक्य नसल्यामुळे निराश्रीत भिक्षेकरी परप्रांतीय लोकांना भोजनाची समस्या निर्माण झाली. दरम्यान शहरातील जिल्हा शांतता कमेटीचे सदस्य रमेश कराळे व गजानन शिंदे यांच्या लक्षात येताच चिमूर कुणबी समाज संघटना यांचेकडे संकल्पना मांडली यांच्याच संकल्पनेतुन कुणबी समाज संघटनेने सामाजीक बांधीलकी जपत दोन वेळेचे जेवन देत निराश्रीत, भिक्षेकरी, परप्रांतीय व गरजु लोकांना भोजनदान केले.
चिमूर येथील कुणबी समाज संघटना नेहमीच कोणत्याही कामात अग्रेसर असते.समाजाच्या प्रत्येक कुंटूबाने अन्नदान व आर्थीक सहकार्य करत सामाजीक बांधीलकी जोपासत समाज बांधव व भगीनीच्या योगदानातुन केसलापुर येथील गरजू, निराश्रीत, परप्रांतीय, संचारबंदीत अडकलेले नागरीक व नागरीकांकडून संचारबंदीचे उलंघन होवू नये व शहरात कोरोणा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळन्यासाठी कुटुंबाची पर्वा न करता नागरीकांच्या सुरक्षाची काळजी घेत शहरातील रस्त्यावर पहारा देत जानीव जागृती करून अविरत सेवा देनारे दक्ष पोलीस विभागाला दोन दिवस भाजी पोळी भाताचे जेवण देत भोजनदान केले. यावेळी भोजनाचा आस्वाद घेताना चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल, तहसिलदार संजय नागटिळक, पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे आदी उपस्थीत होते.
भोजनदानाचा कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी नारायण निखाडे, गजानन शिंदे, रमेश कराळे, एकनाथ थुटे,विलास वडस्कर,अनील डाहुले, लढी, कसारे,वैद्य,तुकाराम,उरकुडे,पवन ठाकरे,घनश्याम चाफले,धोंगडे,खिरटकर, ढोरे, किशोर भोयर, दिलीप कराळे,फरकाडे, बालाजी ढाकुणकर,चाफले किर्ती रोकडे, दिपक यावले, विनोद भोयर,अर्जुनकर, लांडगे, ज्योती ठाकरे,श्री निवटे, रोकडे,झाडे पाटील,जोगेश्वरी थुटे, मधू काळमेघ,वैद्य, विनोद ढाकुनकर,शास्रकार, ठवकर,दूधनकर,सोनटक्के,कारेकर, आदीनी विशेष सहकार्य केले.






