Amalner

कृषिदुताचे प्रात्यक्षिकातून बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन… ग्रामीण कृषी जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे बांधावर दाखवली प्रात्यक्षिके..

कृषिदुताचे प्रात्यक्षिकातून बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन… ग्रामीण कृषी जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे बांधावर दाखवली प्रात्यक्षिके..

रजनीकांत पाटील
कृषिदुताचे प्रात्यक्षिकातून बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन… ग्रामीण कृषी जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे बांधावर दाखवली प्रात्यक्षिके…
अमळनेर :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषिदुत यतिश सुनील साळुंखे विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी जागृकता कार्यनुभव कार्यक्रमाद्वारे अमळनेर तालुक्यातील मारवड येथील शेतकरी बांधवाना व ग्रामस्थांना प्रत्यक्ष बांधावर जावून कृषी विषयक मार्गदर्शन करत आहेत. कृषिदुत विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जसे की, निंबोळी अर्क बनविणे, चारा प्रक्रिया, शून्य ऊर्जा, शीत कक्ष, मातीचा नमुना घेणे. एकात्मिक तन नियंत्रण तसेच एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या पद्धती, व फळबागांची लागवड इत्यादी प्रात्यक्षिके करून शेतकऱ्यांना आधुनिक व पारंपारिक शेतीची सांगड घालून आपले उत्पादन कसे वाढवता येईल, याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील, उपप्राचार्य प्रा. पी.एस.देवरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. दि.फाफळे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शेतकरी व ग्रामस्थांचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे, असे कृषिदुत यतिश साळुंखे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button