शहापूर परिसरातील शेतकऱ्यांचे आमदार, प्रांताधिकारी, कृषी अधिकारी व तहसीलदारांना निवेदन…
दुष्काळ घोषित करून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदन देत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
संपूर्ण तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून तालुक्यात विविध ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळावी अशी मागणी केली.
आमदार अनिल भाईदास पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, कृषी अधिकारी भरत वारे यांना सदर निवेदन शेतकरी मंडळींनी सादर केले. यावेळी भाऊसाहेब पाटील पोलीस पाटील, डॉक्टर भानुदास पाटील, कैलास पाटील, ग्रापं सदस्य दिलीप पाटील, माजी सरपंच संजय पाटील, माजी सरपंच प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर माळी, खुशाल पाटील, विजय माळी, प्रशांत पाटील, जगदीश पाटील, निलेश पाटील, समाधान निकम, ग्रामसेवक बाळू पाटील, सचिन पाटील, प्रशांत सुनील पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.






