Maharashtra

राज्य शासनाने अल्प दरात रेशन दयावे आमदार सुजितसिंह ठाकूर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

राज्य शासनाने अल्प दरात रेशन दयावे आमदार सुजितसिंह ठाकूर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नी लॉक डाऊनचा निर्णय घेताच क्षणी केंद्रातील पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सरकारने जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत १लाख ७० हजार कोटींचा विशेष पॅकेज योजना करून गरीब, शेतकरी, मजूर ,महिला ,वृद्ध ,निराधार ,विधवा ,अपंग ,खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आदी समाजातील खूप मोठ्या वर्गाला मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर मध्यमवर्गीयांना राज्य सरकारने मोफत नाही, तर किमान २ रू. किलो प्रमाणे गहू आणि ३ रू. किलो प्रमाणे रेशन दुकानातून धान्य देऊन दिलासा द्यावा.कोरोना प्रादुर्भाव संकटाच्या काळात कोणाचीही अन्नविना उपासमार होऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत.

तीन महिने रेशन दुकानातून माल उचलला नाही. त्यामुळे बंद (एनपीएच) झालेले रेशन कार्ड चालू (पीपीएच) करून त्यांना धान्य द्यावे.ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा लोकांची नांवे तहसीलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही रेशन दुकानातून धान्य द्यावे अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषद मुख्य प्रतोद भाजपा प्रदेश सरचिटणीस, आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच अन्न पुरवठा मंत्री यांना केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button