Amalner

Amalner: रोटरी क्लब तर्फे श्री मंगळदेव ग्रह मंदिरातील रोटरी गार्डन मध्ये तीन खेळण्यांचे लोकार्पण

रोटरी क्लब तर्फे श्री मंगळदेव ग्रह मंदिरातील रोटरी गार्डन मध्ये तीन खेळण्यांचे लोकार्पण

आज रोजी मंगळ ग्रह मंदिरा मधील रोटरी गार्डन मध्ये लहान मुलांचे खेळण्याच्या साहित्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याच निमित्ताने अमळनेर रोटरी क्लब ची सर्वसाधारण सभा त्याच ठिकाणी उत्साहात पार पडली. त्यात रोटरी परिवारातील सन्माननीय सभासदांना मिळालेल्या पुरस्कारांसाठी क्लब मार्फत सत्कार करण्यात आला. त्यात उद्योगपती मा. रो.श्री. विनोदभैय्या पाटील यांना मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल, रो.डॉ राहुल मुठे यांना त्यांनी वैदयकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल, रो.प्रशांत निकम यांनी बांधकाम क्षेत्रात, रो.डॉ. शरद बाविस्कर यांनी वैदयकीय क्षेत्रात,रो.रोहित सिंघवी यांनी विमा क्षेत्रात तसेच श्री.डीगंबर महाले सर यांचा सेवा निवृत्ती व पर्यटन क्षेत्रात पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सन 2022 – 2023 या वर्षासाठी नूतन रोटरी अध्यक्ष म्हणून रो.किर्तीकुमार कोठारी व सेक्रेटरी म्हणून रो.ताहा बुकवाला यांची एक मताने निवड करून जाहीर करण्यात आले.सभेचे सूत्रसंचालन रो.सुबोध यांनी केले. सभेनंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते असें प्रेसिडेंट रो.वृषभ पारख व सेक्रेटरी रो.प्रतीक जैन यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button