सावदा येथे गौसियानगर भागात कोंबड्यांचा मृत्यू : पशुवैद्यकीय अधिकार्यांनी केली पाहणी, बर्ड फ्लू नाही !
युसूफ शाह सावदा
सावदा : दि. 27 जानेवारी सावदा येथील खाजानगर भागातील गौसियानगर भागात रहिवासी असलेले शेख निसार शेख नबी यांच्या दोन दिवसांत चार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यावर तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ निलेश राजपुत् आणि डाँ संजय धांडे यांनी घटनास्थळी भेट घेऊन विचारपूस केली असता, त्या कोंबड्यांचा बर्ड फ्लू ने मृत्यू झाला नसल्याचा निर्वाळा देत बर्ड फ्लू संदर्भात सविस्तर माहिती दिली . राज्यात बर्ड फ्लूची साथ सूरू असल्याने या भागात तर्क वितर्क लावले जात होते.
गौसियानगर भागात काल शेख निसार शेख नबी यांच्या दोन कडखनाथ जातीच्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. सुरवातीला येथील कोंबड्यां सुस्तावलेल्या अवस्थेत येऊन काही वेळातच माना टाकून मृत पावत आहे. आजही अशाच प्रकारे दोन देशी कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याने परिसरात खळबळ उडाली . येथील मृत कोंबड्यांची खबरदारी म्हणून मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना घटना समजताच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ निलेश राजपुत् यांचेशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर तातडीने डॉ राजपुत् व डॉ धांडे हे घटनास्थळी येऊन विचारले असता, त्या दफन न करता फेकून दिल्याचे समोर आले. यावेळी संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी, यांनी त्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाला नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी बर्ड फ्लू च्या लक्षणे संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच यापुढे कोणत्याही पशुपक्ष्यांच्या संदर्भात काही लक्षणे आढळल्यास लगेच न पा किंवा डॉक्टरांना कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी डॉ. निलेश राजपुत् डॉ संजय धांडे शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी. गणेश माळी पत्रकार शेख फरिद शेख निसार शेख नबी आदि उपस्थित होते.






