मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दशरथ यादव
विश्व साहित्यिक आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त बहुजन रयत परिषद व N.Y ग्रुपच्या वतीने कार्यकारणी जाहीर.
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर विश्व साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दशरथ यादव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
बहुजन रयत परिषद सोलापूर, पंढरपूर व एन. वाय. ग्रुपच्या वतीने विश्व साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची बैठक पंढरपूर येथे फिजिकल डिस्टन्स व आपत्ती व्यवस्थापन कायदा पाळत ऑनलाईन मोबाईल वरती बहुजन रयत परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नागेशभाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक पार पडली. यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दशरथ यादव तर उपाध्यक्षपदी पंढरीनाथ कदम यांची निवड करण्यात आली.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे शहराध्यक्ष किशोर खिलारे, उपाध्यक्ष भोला साठे, ॲड. बादल यादव, भाऊसाहेब कांबळे,नाथा यादव, सत्यवान यादव, उमेश कांबळे, लहू रणदिवे, सूर्यभान वाघमारे, अनिल यादव, लोकेश यादव, प्रदीप यादव, प्रसाद यादव, अनिल खिलारे आदी ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.






