उच्चशिक्षित तरुणाने दोन मुलांसह विधवा असलेल्या वहिनीशी लग्न करून समाजात एक आदर्श केला निर्माण
फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी
लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जतात असा समज असला तरी आजच्या विज्ञान युगातील “हायटेक” जमान्यात ही काही जण आप आपल्या परीने समाजासमोर आदर्श घडवित असतात. अशाच एका उच्चशिक्षित तरुणाने दोन मुलांसह विधवा असलेल्या वहिणीशी लग्न करून सुतार समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे या विवाहाला सुतार समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. लग्नसोहळा सर्वांच्या साक्षीने पार पाडण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील ब्रुहानपूर जवळील खकनार येथील कविता हिचा विवाह फैजपूर येथील किशोर निंबाळे मिस्त्री यांचे जेष्ठ चिरंजीव स्वप्निल निंबाळे यांच्याशी आठ वर्षापूर्वी झाला होता. त्यांचा संसार ही सुखाने सुरू होता यादरम्यान स्वप्निल याचा मार्च 2018 यावर्षी वाहन अपघातात मृत्यू झाला. यामुळे निंबाळे परिवार वर मोठे संकट कोसळले होते. स्वप्निलच्या मृदू स्वभावामुळे फैजपुर सह परिसरात स्वप्निल परिचित होता. त्याच्या या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. (कै) स्वप्निल यांचा आतेभाऊ चंद्रकांत उर्फ पप्पू जाधव या उच्च तरुणाने उच्चशिक्षित तरुणाने निंबाळे परिवाराला धीर देत कविताचा दोन मुलासह स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुतार समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी एकत्र येऊन या निर्णयाला होकार देत. पुनर्विवाहाला संमती दिली. कविता व चंद्रकांत यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात पार पाडण्यात आला. कविताचा दोन मुलांसह स्वीकार करणाऱ्या या उच्चशिक्षित तरुण चंद्रकांत जाधव यांचा लोकप्रतिनिधी व समाजातील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे. या हायटेक समजल्या जाणाऱ्या समाजापुढे चंद्रकांत दोन मुलांसह कविता चा स्वीकार करून आदर्श घडविला आहे.






