कंटेन्मेंट झोनमधील नागरीकांची नगरसेवक विक्रम शिरसट यांनी करून घेतली घरोघरी जावून आरोग्य तपासणी
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना या महामारी रोगाचा विळख आवळला जात असून रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. येथील आण्णाभाऊ साठे नगर व 197/ब येथे एकाच दिवशी 22 रूग्ण पॉझिटीव्ह आल्यामुळे हा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आला. तसेच याच परिसरात पंढरपूर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने राहत असल्यामुळे नगरसेविक विक्रम शिरसट यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य कर्मचार्यांमार्फत येथील नागरीकांची आरोग्य तपासणी करून घेतली.
पंढरपूर तालुक्यात 491 कोरोना पॉजिटिव्ही व 7 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मध्यवस्ती असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर व 197/ब रामबाग येथे काल 22 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आरोग्य अधिकारी बजरंग धोत्रे व कर्मचार्यांच्या मदतीने परिसरातील नागरीकांची आरोग्य तपासणी करून घेवून ज्या नागरीकांना ताप, सर्दी, खोकला आहे अशा प्रकारची लक्षणे आहेत त्या नागरीकांना योग्य उपचार देण्यात आले व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अण्णाभाऊ साठे नगर व 197/ब रामबाग येथे काल 22 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे येथील संपूर्ण परिसर जंतुनाशक करण्यात आला.






