सोलापूर जिल्ह्याचे नेते व राजकारणातील संत आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांची प्रकृती ठीक होण्यासाठी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी महादेवाला अभिषेक करून साकडे घातले
प्रतिनिधी रफीक आत्तार
सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राजकारणातील संत म्हणून ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते असे ज्येष्ठ नेते आदरणीय श्रीमंत सुधाकर पंत परिचारक (मोठे मालक) व श्री.प्रभाकर मालक परिचारक यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी पंढरपूर शहर आणि तालुक्यांमध्ये व सोलापूर जिल्ह्यांमध्ये समजताच सर्व लोकांमधून विविध प्रकारे प्रार्थना केल्या जात असून परिचारक यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी आणि त्यांनी कोरोना संकटावर मात करून लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा घरी यावे याकरिता प्रार्थना केल्या जात आहेत. परिचारक यांनी लवकरात लवकर कोरोना वर मात करावी यासाठी नगरसेवक विक्रम भैय्या शिरसट यांनी महादेवाला अभिषेक करून साकडे घातले असून महादेवाकडे त्यांनी परिचारक यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याकरीता मनोमन प्रार्थना केली आहे परिचारक यांचे कार्य सोलापूर जिल्ह्यात मोठे असून त्यांनी अनेक गोरगरीब गरजवंत शेतकरी यांचे विविध प्रश्न मार्गी लावलेले आहेत साखर उद्योग असो वा एसटी महामंडळ असो बँकिंग क्षेत्र असो वा सामाजिक क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रातील आलेल्या माणसाचे समाधान करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम परिचारक यांनी सदैव केलेले आहे आपल्या वाड्यावर आलेल्या व्यक्तीचे काम पूर्ण करूनच, त्याला समाधानी करूनच माघारी पाठवण्याची कौशल्य परिचारक यांचे आहे म्हणून जनसामान्य माणसांनी मध्ये त्यांची ओळख ही दैवत म्हणूनच निर्माण झाली आहे राजकारणातील संत असे त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्यामुळेच आज त्यांच्या कुटुंबावर कोरोना सारख्या गंभीर संकट आले असताना पंढरपूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांमधून त्यांच्या प्रकृती ठीक होण्यासाठी व या संकटावर मात करून बरे होऊन घरी परतण्यासाठी प्रार्थना केल्या जात असून आपला हा विठूराया, आपले संत ह्या आजारातून लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना शहर तालुका व जिल्ह्यातील विविध ठिकाणी सामजिक राजकीय व शेतकरी वर्गातून केल्या जात आहेत






