Maharashtra

कोरोना पळवा देश वाचवा प्रशासनाला ला सहकार्य करा इंद्रजीत डुमणे गागलेगावकर तालुकाध्यक्ष युवा पँथर बिलोली

कोरोना पळवा देश वाचवा प्रशासनाला ला सहकार्य करा इंद्रजीत डुमणे गागलेगावकर तालुकाध्यक्ष युवा पँथर बिलोली

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंनदिवस वाढत चाललेला आहे ही परिस्थिती पाहता लॉकडाऊन मध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. शासन स्थंरावर चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे
ग्रामीण भागातील जनतेला माझं आव्हान आहे राशन दुकान किंवा इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी करू नये आपली एक चूक आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आणि परिसरासाठी धोक्याचे ठरू शकते आज देशावर तर खूप मोठे संकट आलेले आहे करोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे या लढाईत प्रत्येक भारतीय शिपाई आहे प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करायचे आहे महाराष्ट्रात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे हे पाहता आता असे वाटते की, लोक मनावर घेताना दिसत नाहीत निष्काळजी कराल तर मृत्यू अटळ आहे हे लक्षात असू द्या या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्या ही लागण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकार विविध उपाययोजना करत आहे साबनाने वारंवार हात धोने सलग वीस सेकंद हात धोने तोंडावर मास्क लावणे तसेच इतरांशी बोलताना किमान एक मीटर अंतर राखणे ह्या उपाय योजना आहेत काही लोक या सूचनांचे पालन करताना दिसत नाही करोना संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे करोनाची लागण रोखण्यासाठी संचार बंदी हा एकमेव उपाय आहे तसेच या लोक डाऊन च्या काळात जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या योग्य किमतीला विकल्या पाहिजेत जर चढ्या भावाने दुकानदार विकत असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवा आणि दुकानदाराला पण माझी विनंती आहे लोकांच्या मजबुरीचा फायदा घेऊ नका माणुसकी दाखवा.
शासनाला माझी विनंती आहे लॉक डाऊन च्या काळात लोक उपासमारीने मरणार नाहीत याची जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे राज्यातील जनतेला माझा आव्हान आहे कोणीही घराबाहेर पडू नये विनाकारण रस्त्यावर फिरू नये प्रशासनाला सहकार्य करा अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात असालं तर समांतर अंतर ठेवा अशाप्रकारे केल्यास आपण ही लढाई जिंकू शकतो म्हणून म्हणतो कोरोना पळवा देश वाचवा प्रशासनाला सहकार्य करा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button