प्रतिनिधी अमोल राजपूत
वालचंदनगर वार्ताहर :-
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनता काळजीपोटी स्वतःला व कुटुंबातील सदस्यांना घरात सुरक्षित ठेऊन “लॉकडाऊन”खाली निवांत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र समाजाची सेवा करीत आहेत. ते सुरक्षित असले तरच कुटुंब सुरक्षित राहू शकत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून. पोलिसांना सॅनिटाइजर, मास्क, हॅन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती पोलीस मित्र महिला जिल्हाध्यक्षा शुभांगी वसंत चौधर यांनी दिली.
वालचंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पत्रकारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.त्रिवेणी ऑईल व पोलीस मित्र संघटना पुणे यांच्यामार्फत सॅनिटाइजर, मास्क , हॅन्डग्लोज यांचे वाटप बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन, वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले.
यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलिस हवालदार शरदा तावरे,पो.हवालदार प्रकाश माने,पोलिस नाईक मोहन ठोंबरे,पो. कॉ. लक्ष्मण साळवे पो. कॉ. विजय शेंडकर,वालचंदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष अमरसिंह निंबाळकर ,व्यापारी विजय कांबळे
पत्रकार तात्यासाहेब घाटे, अमोल रजपूत, प्रसाद तेरखेडकर, पोपट मुळीक आदी उपस्थित होते.
फोटो ओळी:- पोलीस मित्र महिला संघटना व त्रिवेणी ऑईलच्या वतीने पोलिसांना व पत्रकारांना मोफ़त मास्क सॅनिटाइझर, हॅन्डग्लोज वाटप करण्यात आले.






