कोरोना मुक्ती अभियान राबवा.नागरिकांनो आता तरी सावध व्हा -सपोनि राहुल वाघ
मुबारक तडवी प्रतिनिधी मोठा वाघोदा
सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नाही नाही म्हणता कोरोना विषाणू आपल्या दारात येवुन धडकला आहे आणि आता आपल्या घरात येण्यासाठी आपले दार ठोठावत आहे व त्याला आपला घरापर्यंत येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण आपल्या सावदा शहरात आजुबाजूच्या सर्व शहरापेक्षा जास्त प्रमाणात केळीचा व्यवसाय चालतो मोठ्या प्रमाणात केळी कामगार एकत्र येवुन मजुरीसाठी जात असतात, तसेच प्रत्येक गावात विनाकारण फिरणाय्रांची पण कमी नाही, कायदेशिर कारवाई तर आम्ही करीत आहोतच परंतु तेवढे करून आता भागणार नाही, कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर सर्वांनी आपल्या स्वतः ला काही निर्बंध लावुन घेणे अत्यंत गरजेचे झाले असुन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही गरजेचे झाले आहे, आपली सुरक्षा आपल्याच हातात असुन त्याची काळजी आपण स्वतः च घेवुन कोरोना ला हद्दपार करायचे आहे. व त्यासाठी प्रत्येकाने मास्कचा लॉक डाऊन चे काटेकोर पालन करा घरातच रहा सुरक्षित रहा आपण व आपल्या परिवाराला कोरोनापासून दूर- ठेवण्याकरिता सोशल डिस्टंन्सीग चा वापर करणे, दोन व्यक्तीमध्ये सुरक्षीत अंतर ठेवणे, व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे कोरोना या महाभयंकर रोगाच्या प्रादुर्भाव पासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन ही सावधान पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे.






