Nashik

सुजाण नागरिकत्वासाठी संविधान साक्षरता आवश्यक:प्राचार्य डॉ.संजय सानप

सुजाण नागरिकत्वासाठी संविधान साक्षरता आवश्यक:प्राचार्य डॉ.संजय सानप

सुनिल घुमरे

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनी आपण भारताचे नागरिक म्हणून भारतीय राज्यघटना जाणून व समजून घ्यायला हवी. सुज्ञ व चांगला नागरिक घडवण्यासाठी आपली राज्यघटना पुरेशी असुन प्रत्येक नागरिक संविधान साक्षर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. दिलीप कुटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतात भारतीय राज्यघटनेत सामाजिक, राजकीय, न्यायाचे प्रतिबिंब राज्यघटनेत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात नवजीवन रक्त पेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकजा अहिरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद दुधाने यांनी केले तर आभार प्रा. नाना चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप व उपप्राचार्य डॉ. सुनील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नाना चव्हाण, प्रा. पंकजा अहिरे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रल्हाद दुधाने, डॉ. संतोष भैलूमे, डॉ.अरविंद केदारे तसेच कार्यालयीन कर्मचारी सुनील चव्हाण, राहुल काळे, योगेश बोडके, मोबीन सय्यद, रवींद्र गवळी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button