चांदवडला आ. डॉ राहुल आहेर यांचा आभार मेळावा संपन्न..
चांदवड विजय जाधव. आज दिनांक 1/12/2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सेल हॉल मध्ये चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आमदार डॉ राहुलदादा आहेर यांचा कार्यकर्त्यांना व मतदारांना आभार मेळावा संपन्न झाला.
यासाठी भाजपा,शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,आर पी आय आदी मित्रपक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी आभार व्यक्त केले.त्यानंतर आमदार राहुलदादा आहेर यांनी आभार व्यक्त केले.यावेळी आमदार साहेबांनी जलसिंचन व पाण्याचा प्रश्न आगामी काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.






