Amalner

अमळनेर: कोचिंग क्लासेस संघटना(PTA) आणि कुबेर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी जयंती निमित्त-जिल्हास्तरीय स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन….

कोचिंग क्लासेस संघटना(PTA) आणि कुबेर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी जयंती निमित्त-जिल्हास्तरीय स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन….

अमळनेर: कोचिंग क्लासेस संघटना(PTA)तसेच श्री.महेंद्र सुदाम महाजन व कुबेर ग्रुप,अमळनेर तर्फे-24 डिसेंबर रोजी साने गुरुजी जयंती निमित्त-जिल्हास्तरीय स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन-इ.5वी ते 12वी वर्गासाठी वेळ-दुपारी- 4 वाजता शहरातील एम.जे.हॉल येथे करण्यात आलेले आहे.
मातृह्रदयी पुज्यनीय साने गुरुजी यांची जन्मभूमी जरी कोकण असली तरी कर्मभूमी मात्र अमळनेर असून त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकानं तर अवघ्या जगाला वेड लावलेलं आहे. 24 डिसेंबर हि साने गुरुजींची जयंती,दरवर्षी यानिमित्त क्लासेस संघटनेतर्फे कोणत्या-ना-कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.विद्यार्थी संस्कारक्षम होण्यासाठी तसेच साने गुरुजींचे विचार सर्वत्र उमलण्यासाठी एका अनोख्या पद्धतीने अमळनेर क्लास संघटनेतर्फे यावर्षीही पु.साने गुरुजींची जयंती साजरी केली जाणार आहे.सदरील स्पर्धेला आजी माजी आमदार यांची उपस्थिती असणार आहे तर सदरील उपक्रमास विशेष सहकार्य महेंद्र सुदाम महाजन यांचे असणार आहे.

स्पर्धेचे विषय-

श्यामची आई पुस्तकातील 42 रात्रींपैकी(गोष्टींपैकी)कोणतीही एक रात्र-कथन
करणे.

वेळमर्यादा– मिनिटे(2+1)

लहान व मोठा गट असून भरपूर बक्षिसे व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास आकर्षक सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन कोचिंग क्लासेस संघटना अध्यक्ष(PTA)व स्पर्धा प्रमुख- भैय्यासाहेब मगर सर(9423904483) यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button