CM Update: माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा यु टर्न…
मुंबई महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेच दिवस उलटून गेले आहेत. तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे. अनेक उलाढाल करूनही भाजप काही गोष्टींसाठी मान्यता देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.मुख्यमंत्री पदासाठी बरीच बार्गेनिंग सुरू असल्याची चर्चा आहे.अश्यातच महायुतीचा नवा मुख्यमंत्री निवडण्याच्या प्रयत्नात एकनाथ शिंदे काही दिवस गावी गेले होते. दरम्यान, शिवसेनाप्रमुख काही मोठी रणनीती तयार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ते गावावरून परतले असून त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
महाआघाडीतील आपल्या भूमिकेबाबत एकनाथ शिंदे यांनी माझी भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पीएम मोदी आणि अमित शहा घेतील. आमचा त्यांना पाठिंबा आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
महायुतीच्या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे हे गावी गेले होते,
माहिती अशी की, गेल्या शुक्रवारी (29 नोव्हेंबर) हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावला रवाना झाले होते. याआधी मुंबईत महाआघाडीची बैठक होणार होती, मात्र त्यात ते हजर राहिले नाहीत. दरम्यान, महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेबाबत घेतलेल्या निर्णयांवर ते खूश नसल्याचे मानले जात होते.
दोन दिवसांनी म्हणजे आज रविवारी (1 डिसेंबर) एकनाथ शिंदे पुन्हा परतले. आता आज रात्री किंवा उद्या सकाळ पर्यंत काही मोठ्या राजकीय घडामोडी समोर येण्याची शक्यता असून महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबतची स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






