Chandwad

अभिजात भाषा मराठी ; अभिमान सोहळा संपन्न…

अभिजात भाषा मराठी ; अभिमान सोहळा संपन्न…

माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेबांनी सकल मराठी भाषिकांना दिलेल्या अनोख्या भेटीबद्दल आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ‘ अभिजात भाषा मराठी ; अभिमान सोहळा ‘ चे आयोजन चांदवड तालुका भाजपा, शिक्षक आघाडीच्या वतीने श्री नेमिनगर जैन गुरुकुल येथील आबड , लोढा , सुराणा आणि जैन कनिष्ठ महाविद्यालय चांदवड येथे उत्साहात संपन्न झाला.
काहीच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर एकच जल्लोष झाला सगळ्याच मराठी भाषिकांनी आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. सगळ्या साहित्यिक , कवी , लेखक , यांना एक वेगळा न्याय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिळवून दिला. यामुळे मराठी भाषेला एक अनोखी ओळख निर्माण झाली आणि नवीन लिखाण करण्यासाठी व मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी नवीन संधी / प्रोत्साहन मिळाल्याची भावना जागृत होऊन आनंद व्यक्त करण्यासाठी व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या या अनमोल भेटीबद्दल आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला.
ग्रंथ पूजनाने या सोहळ्यात सुरुवात झाली. या सोहळ्याचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध कवी प्रा. सुदाम राठोड सर यांनी मराठी भाषेचा महिमा व मराठी भाषेचा प्राचीन इतिहास व अभिजात भाषा म्हणजे काय? आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मराठी भाषा संवर्धनासाठी काय फायदा होईल हे आपल्या व्याख्यानातून कथन केला. यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना धन्यवाद देण्यासाठी आभाराचा ठराव संमत करण्यात आला.
याप्रसंगी भूषण कासलीवाल ( प्रथम नगराध्यक्ष चांदवड ) , मनोज शिंदे ( भाजपा तालुकाध्यक्ष ) , मोहन शर्मा ( जिल्हा उपाध्यक्ष ) , अशोक व्यवहारे ( प्रांतिक सदस्य ) , विलास ढोमसे ( ज्येष्ठ नेते ) , अशोक भोसले ( ज्येष्ठ नेते ) , बाळासाहेब वाघ ( ज्येष्ठ नेते ) , संजय पाडवी ( जिल्हाध्यक्ष आदिवासी मोर्चा ) , प्रदीप अहिरे सर ( जिल्हा सरचिटणीस शिक्षक आघाडी ) , प्रा. डॉ. सुरेश पाटील सर ( शिक्षक आघाडी चांदवड विधानसभा संयोजक ) , विजय जाधव सर ( मंडल अध्यक्ष शिक्षक आघाडी ) , रवींद्र पवार सर ( तालुका सरचिटणीस शिक्षक आघाडी ) , पत्रकार सुनील सोनवणे , पत्रकार नितीन फंगाळ , तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य योगेंद्र पाटील , प्रा. एस. जी. रोकडे , प्रा. वाय व्ही. देवरे , प्रा. आर. सी. अहिरराव , प्रा. निरंजन गायकवाड व विद्यार्थी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रविंद्र पवार सर ( तालुका सरचिटणीस शिक्षक आघाडी ) यांनी केले. आभार प्रदर्शन संजय पाडवी ( जिल्हाध्यक्ष आदिवासी मोर्चा ) यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button