Maharashtra

लॉकडाऊन काळात किल्लारी पोलीस कर्तव्यात व्यस्त लामजना, तपसे चिंचोली परिसरातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद

लॉकडाऊन काळात किल्लारी पोलीस कर्तव्यात व्यस्त लामजना, तपसे चिंचोली परिसरातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद

औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा

कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात पसरू लागला आहे .अशा गंभीर स्थितही लातुर जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व त्या सोबतच किल्लारी पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.किल्लारी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लामजना ,तपसे चिंचोली, मोगरगा ,जावळी, खरोसा, तांबरवाडी इत्यादी गावात किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद म्हेञेवार ,पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी बिट अंमलदार सचिन उस्तुर्गे, उमाकांत चपटे,अनिल शिंदे ,आबासाहेब इंगळे, सचिन भोळे, यांच्यासह किल्लारी पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी चांगल्या पद्धतीने कामगिरी बजावत आहेत.
किल्लारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात दारूबंदी, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करून संचारबंदी काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी किल्लारी पोलीस अहोरात्र झटत आहेत.
एरव्ही पोलीस स्टेशनमध्ये राहुन आपले कर्तव्य बजावत असतात.मात्र कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात असताना हेच पोलीस कर्मचारी संचारबंदी काळात दिवसरात्र जागी राहून कर्तव्य पार पाडत आहेत.औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन किल्लारी पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.
लामजना तपसे चिंचोली ,मोगरगा ,जावळी अशा अनेक गावातील लोकही कोरोनाच्या जनजागृती दरम्यान संचारबंदी काळात चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात येत आहे.वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स ,कर्मचारी ,पोलीस तसेच इतर प्रशासनही चांगली कामगिरी बजावत आहेत.आपल्या सर्वसामान्यांसाठी ही यंत्रणा २४ तास कार्यरत असताना आपणही त्यांच्या सूचनेचा आदर करत पुढील काही दिवस घरीच राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी किल्लारी सह लामजना तपसे चिंचोली परिसरातील नागरिकांनी सूचनांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन किल्लारी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.

अशा गंभीर स्थितीत आपले एक योगदान म्हणून एक महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करण्याचे धाडस किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी केले आहे.आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचारी ,नागरिकांनी शक्य असेल तितकी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी केले आहे.कोरोनाच्या संकटकाळात पोलीस प्रशासनाकडून एक महिन्याचे वेतन देणारे अमोल गुंडे हे बहुधा जिल्ह्यातील पहिलेच पोलीस कर्मचारी आहेत,त्यांच्या या कार्याचा आदर्श पोलीस प्रशासनातील इतर पोलिसांनी नक्कीच घेण्यासारखा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button