Maharashtra

चिमूर विधानसभा क्षेत्रातील मजूर पोहचले नागभीड रेल्वे स्थानकावर

Breaking news

चिमूर विधानसभा क्षेत्रातील मजूर पोहचले
नागभीड रेल्वे स्थानकावर
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली स्वखर्चातून स्वागावी जाण्यासाठी केली वाहन व्यवस्था ..

प्रतिनिधी ज्ञानेशवेर जुमनाके

चिमूर मतदार संघातील मजूर हे स्वयंरोजगारासाठी तेलंगणा राज्यात गेलेले होते. परंतु कोरोना कोविड 19 विषाणू संकटाने संचारबंदी मुळे त्याच राज्यात अडकले होते .परंतु केंद्र सरकारने मजुरांना आपापल्या राज्यात पोहचविण्यासाठी स्वंतत्र रेल्वे व्यवस्था सुरू केल्या .त्यामुळे 684 मजुरांना दिलासा मिळाला .अखेर ते मजूर तेलगणा राज्यातून नागभीड रेल्वे स्थानावर पोहचले .आणि त्या मजुरांना आपल्या स्वगावी जाण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आपल्या स्वखर्चातुन ट्रॅव्हल्स व बसेस वाहनांची व्यवस्था केली
नागभीड रेल्वे स्थानकावर त्या मजुरांना चहा पाणी व भोजनसेवा व्यवस्था आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या माध्यमातून करण्यात आली
नागभीड ,चिमूर ,सिंदेवाही तालुक्यातील मजूर असून त्यांची विचारपूस करून रवाना करण्यात आले
यावेळी नागभीड नप नगराध्यक्ष प्रा उमाजी हिरे,उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठाण, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, नप बांधकाम सभापती सचिन आकुलवार भाजप तालुका अध्यक्ष संतोष रडके तसेच चिमूर वरून जेष्ठ नेते राजू देवतळे, गुलाबराव फरकाडे ,आदिवासी नवेगाव पेठ चे शिवदास कुमरे आदी उपस्थित होते .
* स्वगावा कडे परतलेल्या मजुरांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या सेवाभावी कार्याबद्दल प्रशंसा करीत आभार व्यक्त केले
*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button