15 एप्रिलपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करा – मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे
पी व्ही आनंद
राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी 15 एप्रिलपर्यंत झाली पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
?? कर्जमुक्तीच्या कामाचा आपण स्वत: व उपमुख्यमंत्री अजित पवार दररोज आढावा घेऊ, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
??मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ठाकरे ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आले होते. तेथे त्यांनी कर्जमाफीविषयीची पहिली बैठक घेतली.
??21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. याद्या पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने सहकार्य करावे अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.






