Chandwad

चांदवड शहर भाजपा च्या मागणीला यश,गटारीच्या कामाला सुरुवात

चांदवड शहर भाजपा च्या मागणीला यश,गटारीच्या कामाला सुरुवात

उदय वायकोळे चांदवड

वरचेगांव येथील जैन मंदिर ते शनि मंदिर रस्त्यावर अनेक खड्डे व लोखंडी गज बाहेर आल्यामुळे व रस्त्याच्या कडेला असलेली नाली पावसाच्या पाण्यात अनेक दिवसांपासून फुटली होती त्यामुळे रस्ता आर्धा अधीक खचला होता त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाबद्दल व नविन नाली बनविणे व रस्त्याच्या खड्ड्यांची दूरूस्ती लवकरात लवकर करण्या संदर्भात चांदवड भाजपा ने निवेदन दिले व थोड्या दिवसात नालीचे काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांचे समाधान झाले आहे. या मार्गाने दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत व महाविद्यालयात ये जा करतात त्यामुळे विद्यार्थ्यांमधेही समाधान व्यक्त होत आहे.
शहर भाजपा च्या वतीने महेश खंदारे , विशाल ललवाणी , गणेश कुमावत , सागर बडोदे व संजय पाडवी यांनी निवेदन सादर केले होते व त्यानुसार नगर परिषदेने काम सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. याप्रकरणाची तातडीने दखल घेऊन कामाला सुरुवात झालेबद्दल नवीन मुख्याधिकारी श्री ऋषिकेश पाटील साहेब व न प इंजिनीयर शेषराव चौधरी साहेब यांचे पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button