चांदवड शहरातील दुकाने आजपासून 3 दिवस बंद-मुख्याधिकारी
प्रतिनिधी उदय वायकोळे
चांदवड शहरात कालच 3 रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागे होऊन कामाला लागलेली आहे. काही दिवसांपूर्वी चांदवड शहर कोरोनामुक्त झाले होते मात्र हळूहळू एक नंतर तीन असे एकूण चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आता सावधगिरीचा उपाय व फैलाव होऊ नये म्हणून सर्व दुकाने बंद ठेवावीत अशी नागरिकांकडूनच मागणी होत असल्याचे चांदवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री अभिजित कदम यांनी ठोस प्रहार च्या प्रतिनिधिंना सांगितले. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे मुख्याधिकारी कदम यांनी आवाहन केले आहे






