टेंभा येथे महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
प्रतिनिधी :-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टेंभा येथे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ८ मार्च रोजी महिंद्रा लॉजिस्टिक प्रा.लि.व सावली संस्था कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिननिम्मित मा.ठाकूर साहेब यांना आमंत्रन मिळाले होते. ठाकूर साहेब यांच्या आदेशा वरून श्री घोडके सुनील नियतक्षेत्र वनअधिकारी , तसेच विजय वाघे वनमजुर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात महिंद्रा आणि सावली संस्था यांनी प्रमुख पाहुण्यांचे मानसन्मान केला.सदरच्या कार्यक्रमात उपस्थित महिला पैकी सामाजिक काम करणारे तसेच अंगणवाडी शिक्षिका जि.प.शिक्षिका जिजाबाई सामाजिक संस्था चे महिला पदाअधिकारी उपस्थित होत्या.यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत चा कार्यक्रम करून चांगले काम करणारे महिलांचा ट्रॉपी देऊन सत्कार करण्यात आले.
सदरील कार्यक्रमामध्ये तानसा अभयारण्य च्या वतीने मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .वनविभाग कडून 8 मार्च जागतिक महिलाना दिना निम्मित शुभेच्छा देऊन आत्ता पर्येंत बरेच कामे वनविभाग यांनी महिलांना प्रेरणा देणारे कामे केलेले आहे जसे वनविभाग च्या हद्दी लागत असलेले गावांना असलेल्या महिलांना 100 रू भरून गॅस पुरवठा हा वनविभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे .निर्धुड चुलीचे वाटप सुद्धा वनविभाग यांच्या माध्यमातुन केली आहे . तानसा अभयारण्यच्या हद्दीवर असलेले गावे आणि पाडे यांना जंगल संरक्षन बाबत मार्गदर्शन करून सध्या वनवनवा चा हंगाम सुरु झालेला आहे .आपण आपल्या कुटूंबाच्या सदस्य ची जशी काळजी घेत असतो तसे वनप्राणी सुद्धा त्या त्या कुटूंबाची काळजी घेत असतात आपण वनवा लावून त्याचे कुटूंब उद्धवस्त करतो हे करणे कायदयाने गुन्हा असून त्या बद्दल योग्य ती शिक्षा सुद्धा आहे असे सर्व उपस्थित ग्रामस्त पुरुष /महिला यांना समजावुन सांगत वनव्या पासून जंगलाचे संरक्षण करा असे सर्वांना मार्गदर्शन केले .
वनसंपदा हा आपला वातावरणातील अमूल्य वारसा आहे. वनव्यापासून वनसंपदेचे रक्षण करणे हे आपले नैतीक आणि कायदेशीर कर्तव्य आहे हा संदेश यावेळी देण्यात आला.






