माध्यमिक विद्यालय अवनखेड तालुका दिंडोरी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित माध्यमिक विद्यालय अवनखेड तालुका दिंडोरी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केली, त्यांच्या जीवनावर गीत गायन झाले, विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाची विद्यार्थिनी तेजस्विनी पिंगळ ही होती. दरम्यान विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक वाय. यू. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. के. शिंदे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. श्री. नवले पी. ई. यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.






