Nashik

नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथे करोना विषयक नियमांचे पालन करून महिला दिन साधेपणाने साजरा

नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथे करोना विषयक नियमांचे पालन करून महिला दिन साधेपणाने साजरा

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : कामाच्या ठिकाणी त्याग समर्पण आणि कमिटमेंट असेल तर जगातील जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला करिअर करण्यापासून रोखू शकत नाही असे प्रतिपादन कामगार मंत्रालयाच्या कामगार शिक्षण विभागाच्या प्रादेशिक संचालक सौ सारिका डफरे यांनी केले औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अर्थात लेडीज आयटीआय येथे करोना परिस्थिती विषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करून जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी औद्योगिक क्षेत्रातील महिलांचा सहभाग या विषयावर त्या आपले विचार व्यक्त करीत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य सौ माधुरी भामरे या होत्या यावेळी बोलताना प्रादेशिक संचालक सौ सारिका डफरे म्हणाल्या की ज्यांच्या मागे कुटुंबाचा पाठिंबा आहे त्यांनी करिअर मध्ये ही मोठे यश संपादन केले आहे यशामागे कुटुंबीयांचा त्याग आवश्यक आहे आपण सावित्रीबाई फुले यांना पूज्य मानतो एक सावित्री घडायला मागे ज्योतिबा असावा लागतो हा ज्योतिबा भाऊ वडील किंवा पतीच्या रूपात मिळतो तरुणींनी मोबाईलचा वापर स्वतःच्या विकासासाठी करावा उत्कर्ष मिळविण्यासाठी थोड टफ व्हाव लागेल स्वतःमध्ये सुधारणा घडवाव्या लागतील तांत्रिक भारतात महिला कमी दिसतात महिलांनो नुसती डिग्री डिप्लोमा घेऊन लग्नाला चांगला मुलगा मिळावा म्हणून घरी बसू नका तर शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी करावा असे त्यांनी सांगितले यावेळी दुसऱ्या प्रमुख पाहुण्या
शासनाच्या बी टी आर आय च्या कनिष्ठ सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार सौ वंदना वाघ म्हणाल्या की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलींना विविध शासकीय कार्यालयात अप्रेंटीशीप मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या संस्थेतील मुलींनी लॉक डाऊन काळात शासकीय कार्यालयात केलेल्या कामाचे नाशिकचे विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे यांनीदेखील कौतुक केले आहे भावी काळात सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने महिलांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे उत्कर्षासाठी संघर्षाला पर्याय नाही मिळालेल्या संधीचा फायदा घेतला पाहिजे संधी मिळविण्यासाठी संबंधितांना विचारलं पाहिजे फॉलोअप घेऊन स्वतःला सिद्ध करायला पाहिजे बिकट वाट वहिवाट हे लक्षात घेऊन अडथळे पार पाडून पुढे जायला पाहिजे असे त्यांनी सांगितले अध्यक्षपदावरून बोलताना संस्थेच्या प्राचार्य सौ माधुरी भामरे यांनी ओझरखेड येथील आदिवासी व गरीब गरजू महिलां राष्ट्रीय सेवा योजना आणि संस्थेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन सॅनिटायझर मास्क यांचे वाटप करून नियमित आरोग्य स्वच्छता व करोना विषयक जनजागृती केली याच दिवशी आमचा खरा महिला दिन साजरा झाला असे सांगितले
प्रशिक्षणार्थी महिलांचे हे शिकण्याचे वय आहे मोबाईल आणि इतर गोष्टींच्या आणि आकर्षणाच्या नादी लागून शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका यावर्षीच्या महिला दिनाचे घोषवाक्य चूझ द चॅलेंज म्हणजे आव्हाने शोधा स्वीकारा हे आहे याची त्यांनी प्रशिक्षणार्थींना जाणीव करून दिली प्रास्ताविकात संस्थेच्या निदेशक सौ विजया जाधव यांनी संस्थेत सुरू असलेल्या अकरा व्यावसायिक प्रशिक्षणा बद्दल माहिती देऊन संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणी आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत या संस्थेत प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुलगी कोठेही उपाशी राहणार नाही आयटीआय स्तरावर महिलांसाठी राज्यात एकमेव असलेला डिजिटल फोटोग्राफीच्या प्रशिक्षणार्थींनी गतवर्षी औरंगाबाद येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आणि सन्मानाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला गतवर्षीच्या व करोना काळात संस्थेत उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच करोना परिस्थितीचे भान ठेवून आयोजित करण्यात आलेल्या संस्थेतील रांगोळी मेहंदी आदि स्पर्धेतील विजेत्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि प्रत्येक महिला प्रशिक्षणार्थींना सॅनिटरी नॅपकिन देऊन गौरविण्यात आले प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील निर्देशिका सौ मधुरा जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ भाग्यश्री नानकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी गटनिदेशक श्री संजय मस्के व अन्य निदेशक कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले
(फोटो- औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलीची येथील महिला दिनात मार्गदर्शन करताना कामगार मंत्रालयाच्या कामगार शिक्षण विभागाच्या प्रादेशिक संचालक सौ सारिका डफरे व ओझर खेड येथे आदिवासी व गरजू महिलांना करोना जनजगृती करून महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा करताना संस्थेच्या प्राचार्या सौ माधुरी भामरे व शिक्षक निदेशक )मनोगत व्यक्त केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button