येवला येथील आत्मा मलिक गुरुकुलात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : येवला येथील आत्मा मलिक इंग्लिश मिडियम गुरुकुलामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येवला पंचायतसमीतीचे सभापती श्री. प्रवीण रघुनाथ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सौ.रेखा प्रवीण गायकवाड व आत्मा मालिक ध्यानपीठातील महाराज संत चरणदासजी महाराज (संत कंकाली बाबा)प्राचार्य श्री.तुषार कापसे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या नंतर इ.५ वी. ते ७ वी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून जागतिक महिला दिनाला सुरुवात होण्याचा इतिहास सांगितला.विद्यार्थिनींनी भाषणामध्ये सांगितले की आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही ,अशा महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे .विद्यार्थिनींनी महिलांच्या जीवनावर आधारित सुंदर अशा कविता सादर केल्या.तसेच स्नेहल थळकर,राधीका परदेशी,संस्क्रृती पाटील,अश्मिरा शेख ,मधुरा अौटी,रोशनी कोतवाल यांनीही आपले मत मांडले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या साै.रेखाताई गायकवाड यांनी आपल्या भाषणांमधून सांगीतले की एक महिलाही वेगवेगळ्या रुपांमध्ये आपल्याला दिसते आई ,बहीण ,पत्नी ,सासू , सुन ,वहिनी या घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ती आपले काम,ध्येय पूर्ण करत असते कारण आजची स्त्री ही स्वावलंबी आहे ती कोणत्याही क्षेत्रात कमी नाही .शाळेचे प्राचार्य श्री.तुषार कापसे सर यांनी सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की एक महिलाही जशी वासराची गाय असते परंतु आपल्या वासरावर जर संकट आले तर ती दुर्गेचे रूप घेऊन ते संकट तिच्या स्वतःचा शिंगांवर उचलून घेते व समोरच्या राक्षसाचा वध करत असते. परमपूज्य चरणदासची महाराज यांनीदेखील सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साै.राजश्री भोसले मॅडम केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.कापसे सर, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
अशाप्रकारे गुरुकुलामध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम काेराेनाच्या पार्श्र्वभूमीवर नियमांचे पालन करून आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.






