Nashik

एनएफडीसी अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या मंजूर प्रकरणे तातडीने वितरित करा अन्यथा तीव्र आंदोलन-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे…

एनएफडीसी अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या मंजूर प्रकरणे तातडीने वितरित करा अन्यथा तीव्र आंदोलन-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे…

नाशिक असद खाटीक

आज दिनांक 30/9/2020 बुधवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने महात्मा फुले विकास महामंडळ नाशिक विभागाचे व्यवस्थापक श्री.एस.एल. गायकवाड साहेब यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले निवेदनात खालील मागणी मागण्यात आली….

महात्मा फुले विकास महामंडळांतर्गत एनएफडीसी मार्फत बेरोजगार यांचे प्रकरणे मंजूर झाले असून संबंधित जिल्हा कार्यालय यांना निधी पाठवून त्वरित प्रकरणे निकाली काढून सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल हे निवेदन उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आयटी सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ घुसळे, मालेगाव युवा कार्याध्यक्ष राजेशभाऊ पटाईत, जिल्हा नेते किशोर भाऊ आहिरे, जिल्हा युवा नेते किरण भाऊ दोंदे,युवा नेते प्रशांतभाऊ गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button