डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील डॉ.आरोपींची मेडिकल रजिस्ट्रेशन रद्द करा -ऑर्गनाइझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल (आफ्रोट)प्रतिनिधी मुबारक तडवीडॉ पायल तडवी ह्या आदिवासी तडवी भिल समाजातील अनुसूचित जमाती च्या महिला डॉक्टर एमडी च शिक्षण घेत होत्या त्यांची आत्महत्या ही वर्णद्वेशी जातीय तुच्छतेतून व रॅगिंग करुन झाली होती सदर आत्महत्येस प्रवृत्त करणारे तीनही आरोपी डॉक्टरांनी भारतीय संविधानावर जणू प्रश्र्न निर्माण केला आहे डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये व महाराष्ट्र प्रोविबिशन ऑफ रॅगिंग अॅक्ट नुसार गुन्हे दाखल आहेत तसेच
या.न्यायालयाने काही जाचक अटी घालून या आरोपींना जामीन दिला आहे परंतु या अटीतील बारकाव्यांचा फायदा घेत या तिन्ही आरोपीचे निलंबन महाराष्ट्र मेडिकल परिषद मुंबई यांनी मोठ्या शिताफीने मागे घेतले वास्तविक पाहता या केसचा निकाल लागेपर्यंत या आरोपींचे मेडिकल रजिस्ट्रेशन रद्द होणे आवश्यक होते अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे म्हणजे एक देशद्रोहाचा खटला दाखल होणे सारखाच आहे अशा आरोपींना मेडिकल रजिस्ट्रेशन देणे घातक प्रवृत्ती ला प्रोत्साहन देणे सारखेच आहे आणि वैद्यकीय शिक्षण घेत.
असलेल्या अन्य विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखाच आहे तरी महाराष्ट्र मेडिकल परिषदेने संबंधित तिन्ही आरोपीचे मेडिकल रजिस्ट्रेशन रद्द करावे व त्यांची वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना आफ्रोट ऑर्गनाइझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल चे लुकमान तडवी रत्नागिरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे






