Cabinet Extention Update: अखेर सस्पेन्स संपला… उद्या मंत्रीमंडळाचा विस्तार..! हे 12 नेते शपथ घेतील..!
महाराष्ट्रात मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री नंतर आता मंत्रिमंडळ विस्तारावर सस्पेन्स आहे. शिंदेच्या अटी शर्ती मुळे हा विस्तार निर्णय थांबविण्यात आला होता. दिल्लीतील बैठकीला देखील शिंदे अनुपस्थित होते. मात्र अमित शहा यांचा फोन आल्यानंतर आणि अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबाबत मोठा अपडेट दिला आहे. १४ डिसेंबरला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्ताराचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. शिवसेनेतील १२ नेते शपथ घेणार आहेत. तर काहींना संधी नाकारण्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत वाद झाला. तब्बल १२ दिवसांनंतर मुख्यमंत्री पदावरील सस्पेंस दूर होऊन एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले. आता गृहमंत्रालयावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. मात्र, भाजपने शिवसेनेची मनधरणी केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. महाआघाडीमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विभाजनावर एकमत झाले आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे २० मंत्री असतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी १० ते १२ मंत्री असतील. भाजप गृहखाते स्वतःकडे ठेवणार आहे, तर पीडब्ल्यूडी आणि नगरविकास खाती शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या कोट्यात जाणार आहेत. त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रालय मिळू शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहखाते भाजपकडे होते.तर दुसरीकडे या यादीत शिवसेनेच्या बड्या नेत्यांना स्थान देण्यात आले नाही. ज्या आमदारांना भाजपचा विरोध आहे, त्या आमदारांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आले आहे. या यादीत शिवसेनेचे बडे नेते आहेत. यात दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांची नावे आहेत. भाजपच्या विरोधामुळे हे अनुभवी नेते मंत्रिमंडळापासून दूर राहिले आहेत.
शपथविधीमध्ये शिवसेनेचे १२ मंत्री शपथ घेणार आहेत. यात ९ कॅबिनेट ३ राज्यमंत्री पदे असणार आहेत.
शपथ घेणाऱ्यांची यादी
शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभूराजे देसाई
गुलाबराव पाटील
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाठ
भरत गोगावले
आशिष जयस्वाल
शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री
योगेश कदम
विजय शिवतारे
आबिटकर किंवा याड्रावकर





