CAA, NCR NPR रद्दबादल करण्यासंदर्भात
भिम आर्मी भारत एकता मिशन चे
महाराष्ट्र राज्य मंत्रालय चे गृहसचिव मा अमिताभ गुप्ता याना निवेदन.
मुंबई :दि ;२१वार मंगळवार :–
प्रतिनिधी –लक्ष्मण कांबळे
केद्र सरकारने नुकताच CAA NCR NPR हा कायदा लागू करून देशातील केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर आजही गावकुसाबाहेर राहणा-या भटके विमुक्त आदीवासी बंजारा यांच्या सह मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे.
भारतात पिढ्यानपिढ्या राहणा-या बाराबलुतेदार व गावकुसाबाहेरील जंगलात राहणा-या भारतीय नागरीकांकडे सरकारला आवश्यक कागदपत्रे नसली तर मग ते देशद्रोही किंवा त्यांचे वास्तव्यच या कायद्यामुळे अनधिकृत ठरण्याचा धोका आहे
असे करोडो भारतीय नागरीक तांत्रिक कारणास्तव आपले नागरीकत्व सिध्द न करू शकल्यास अशा करोडो लोकांना सरकार कोणत्या देशात पाठवणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे केंद्र सरकारने
1)आपल्या या कायद्याचा पुनर्विचार करावा .
2) भीम आर्मी भारत एकता मिशनचे प्रमुख भाई अॅड चंद्रशेखर आझाद यांनी या कायद्याला लोकशाही मार्गाने जामा मशिद दिल्ली येथे विरोध केला असता दिल्ली पोलीसांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून तिहार जेलमध्ये टाकले या हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करीत असून सबंधित पोलीस अधिका-यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आहोत.
3) सहारनपूर जिल्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी भीम आर्मी राष्ट्रीय मुख्य महासचिव भाई कमलसिंह वालियाजी तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष भाई मनजीतसिंग नौटीयाल व शिवम खेवडीया यांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणावेळी झालेल्या शांतीपूर्ण आंदोलनात जाणीवपूर्वक सहारनपूर जेलमध्ये बंद केले आहे.ही अन्यायकारक कारवाई रद्बादल करून त्यांना त्वरीत मुक्त करण्यात यावे.
4) सामाजिक आंदोलनाची घोषणा करणारे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांना घाटकोपर चिराग नगर पोलीस ठाणे पोलीस प्रशासनाने विनाचौकशी सहा दिवस ठाणे जिल्हा कारागृहात बंद झाले या प्रकरणाची चौकशी करून सबंधित सर्व पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी.
5) लोकशाही मार्गाने काम व आंदोलने करीत असलेल्या महाराष्ट्रातील भीम आर्मीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पोलीसांकडून होत असलेल्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे .महाराष्ट्रातील पोलीसांना तसे आदेशित करण्यात यावे. असे निवेदनावर
अशोकभाऊ कांबळे
राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे महाराष्ट्र प्रमुख सुनीलभाऊ गायकवाड मुंबई प्रमुख सीताराम गंगावणे उपाध्यक्ष राहुल वाघ महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद चे खानभाई जय हो संघटना चे अफरोजभाई मलिक आदी कार्यकर्त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.






