? अर्थसंकल्प 2021.. ठळक मुद्दे..
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे :
• पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना फायदा झाला, घरी असलेल्या नागरिकांनाही जीवनावश्यक वस्तू मिळाल्या.
• आपण परिस्थितीवर लक्ष ठेवलं आणि त्यानुसार नियोजन केलं. पंतप्रधान गरीब कल्याण योजना, 3 आत्मनिर्भर पॅकेज हे एक मिनी बजेट आहे.
• कोरोनाविरुद्धचा लढा 2021 मध्येही सुरुच राहिल, कोरोनानंतरच्या काळात भारत देश हा एक आशेचा किरण बनला आहे.
• भारताकडे आज दोन कोरोना लस उपलब्ध आहेत, स्वतःच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर इतर देशांनाही त्याचा फायदा होईल.
• या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
• आरोग्य सुविधांसाठीची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 137 टक्क्यांनी वाढवली.
• 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी आपली निर्मिती दुप्पट आकड्यांमध्ये वाढायला हवी, हे सर्व वाढवण्यासाठी निर्मिती केंद्रीत सबसिडी.
• जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केली जाईल, पुढच्या 3 वर्षात हे काम होईल.
• राष्ट्रीय पायाभूत सुविधा धोरण पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वाढवण्याची गरज.
• अर्बन क्लिन एअर मिशनसाठी 1.41 लाख कोटी रुपयांची तरतूद.






