Mumbai

?Big Breaking..मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महापालिकेचे थकबाकीदार..!महापालिका करणार का कार्यवाही..!जनतेचं आहे लक्ष..!

?Big Breaking..मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महापालिकेचे थकबाकीदार..!महापालिका करणार का कार्यवाही..!जनतेचं आहे लक्ष..!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी थकवली पालिकेची लाखोंची पाणीपट्टी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची तब्बल 24 लाख 56 हजार 469 रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे. पाणीपट्टी सामान्य मुंबईकरांनी थकवली तर त्यांचे पाणी कापले जाते. त्यामुळे महापालिका मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही अशीच कारवाई करणार का? असा सवाल केला जात आहे.

मुंबई महापालिकेने पाणीपट्टी न भरणाऱ्या या बंगल्यांना डिफॉल्टरच्या यादीत टाकल्याची ही माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. सामान्य नागरिकांनी पाणीपट्टी भरली नाही, तर त्यांची नळजोडणी खंडित केली जाते. त्यामुळे पाणीपट्टी न भरणाऱ्या या बंगल्यांवर महापालिका काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button